आपला जिल्हा
माळी समाज राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद

लातूर ( प्रतिनिधी ) माळी सेवा संघ महाराष्ट्र व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद लातूर यांच्या वतीने आयोजित ६ वा राज्यस्तरीय माळी समाज वधू-वर परिचय मेळावा २०२५ दयानंद कॉलेज सभागृह लातूर येथे उत्साहात पार पडला. यावेळी अनेक विवाहेच्छुकांनी आपला परिचय दिला.
यावेळी विवाहेच्छुकांसोबत पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.





