आपला जिल्हा

खेलो इंडिया युथ वुमेन्स झोनल स्पर्धा विजेत्यांचा विनोद बोराडे मित्र मंडळातर्फे सन्मान

सेलू ( प्रतिनिधी ) 25 ते 27 ऑगस्ट रोजी उत्तरप्रदेश च्या मेरठ येथे झालेल्या खेलो इंडिया युथ वुमेन्स झोनल स्पर्धे मध्ये महाराष्ट्र राज्याच्या टीम मध्ये परभणी जिल्ह्यातील सेलू येथील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली त्या बद्दलविनोद बोराडे मित्र मंडळातर्फे खेळाडूंचा सन्मान केला.

या वेळी गायत्री वाकुडकर,साक्षी गोसावी,ऋतुजा बनसोडे,नंदिनी सरडे,साक्षी ढगे,राधिका चीलगर,अनुष्का लांडगे, दिव्या घोडके यांनी स्पर्धेत स्थान मिळवत विजय मिळवला याबद्दल त्यांचा विनोद बोराडे मिञ मंडळातर्फे सत्कार करण्यात आला,सोबतच परभणी डिस्ट्रिक्ट वूशू असोसिएशन अध्यक्ष अजितदादा वरपुडकर,सचिव पांडुरंग अंभुरे त्यांचे कोच ओम परदेशी व रोनित बब्बर यांचा देखील सन्मान यानिमित्ताने केला.

कार्यकामासाठी मा.नगराध्यक्ष विनोदरावजी बोराडे,साईराज बोराडे,नगर सेवक वाहिद भाई,राजेंद्र पवार,अमर सुरवसे,प्रतीक बोराडे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!