आपला जिल्हा

जनशताब्दी एक्स्प्रेस कायम थांबा व आरक्षण तिकीट उपलब्ध करण्याची डी आर एम यांच्याकडे मागणी

⬛सेलू रेल्वे स्थनकाचे वार्षिक उत्पन्न 6 कोटी 60 लाख रुपये तरी अनेक सुविधा पासून वंचित

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू स्टेशन हे शहर तालुक्याचे ठिकाण आहे. सेलू शहराची लोकसंख्या सुमारे 55 ते 60 हजार आहे. वर्ष 2022-23 साठी वार्षिक संकलन ( सेलू स्टेशनचे ) 6 कोटी 60 लाख रुपये आहे. (पत्रासोबत डीआरएम कार्यालयाचे पत्र जोडले आहे) सेलू स्थानकावर सचखंड एक्स्प्रेससह सर्व महत्त्वाच्या एक्स्प्रेसचे थांबे आहेत. गेल्या ५-६ दिवसांपासून जनशताब्दी एक्स्प्रेसचे (हिंगोली-मुंबई) १५ सप्टेंबर, १६ सप्टेंबर आणि १७ सप्टेंबरचे आरक्षण तिकीट सेलू स्टेशनवरून उपलब्ध होत नाही. त्यामुळे नाशिक-मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होत आहे. आजपासून सेलू येथील जनशताब्दी एक्स्प्रेसचा थांबा कायमस्वरूपी करण्यात यावा.

जनशताब्दी एक्स्प्रेसची काउंटर तिकिटे हिंगोली स्थानकावर दिली जातात (उपलब्ध) त्याचप्रमाणे जनशताब्दी एक्स्प्रेसची काउंटर तिकिटे सेलू स्थानकावर उपलब्ध करून द्यावीत.अशी मागणी प्रवाशी सेवा संघ सेलूच्या वतीने  विजयकुमार मंत्री व्यंकटेश काबरा यांनी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!