आपला जिल्हा
सरपंच धनेगाव,ता.सेलू, जि.परभणी यांच्या विरुध्द पारीत केलेला अविश्वास ठराव वैध
⬛ जिल्हाधिकारी, परभणी यांनी दि 18 डिसेंबर रोजी दिले आदेश

सेलू ( प्रतिनिधी ) ग्रामपंचायत सदस्य, धनेगाव, ता. सेलू, जि. परभणी यांनी सरपंच धनेगाव, ता. सेलू, जि. परभणी यांच्या विरुध्द दिनांक ०६/११/२०२३ रोजी पारीत केलेला अविश्वास ठराव वैध असल्याचे रघुनाथ गावडे भा.प्र.से. जिल्हाधिकारी, परभणी यांनी दि 18 डिसेंबर रोजी आदेशाद्वारे कळवले आहे.
जिल्हाधिकारी गावडे यांनी दिलेल्या आदेशात असे नमूद केले की,ग्रामपंचायत धनेगाव, ता. सेलूची एकूण सदस्य संख्या ही ७ आहे. एकूण ७ सदस्यांचे तीन चतुथोश ५.२५ (पूर्णाकांत एकूण ६ सदस्य) अविश्वास प्रस्ताव पारीत करण्यासाठी आवश्यक 06 ठरतात. अविश्वास प्रा.२०२७/सा.५./ग्रापंनि-२/प्र.क्र.२१ सस्तावाच्या इतिवृत्ताच्या प्रमाणित २० से ३३ वर असलेल्या वितोष एकूण उपस्थित ७ सदस्यांपैकी ६ सदस्यांनी अविश्वास प्रस्तीचे अवलोकन केले, असा आहे. त्यामुळे अर्जदार देविदास नागोराव मगर, सरपंच, धनमापण त्या साजूने जन परभणी यांच्या विरुध्द दिनांक ०६/११/२०२३ रोजी ग्रामपंचायत सदस्यांनी पारीत केलेला अविश्वास प्रस्ताव हा बहुमताने पारीत केलेला असल्याचे दिसून येतो.
१३. सबब, प्रकरणी धनेगाव, ता. सेलू, जि. परभणी येथील सरपंच यांच्या विरुध्द ग्रामपंचायत सदस्य, धनेगाव, ता. सेलू, जि. परभणी यांनी दिनांक ०६/११/२०२३ रोजी अविश्वास ठराव हा बहुमताने पारीत केलेला असल्याने व अविश्वास ठराव पारीत करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ व मुंबई ग्रामपंचायत (सभांबाबत) नियम, १९५९ मधील तरतुदींचे पालन केले गेले असल्याने त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे मी, जिल्हाधिकारी, परभणी प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. अर्जदार देविदास पि. नागोराव मगर, सरपंच, ग्रामपंचायत धनेगाव, ता. सेलू, जि. परभणी यांचा अर्ज फेटाळण्यात येतो.२. ग्रामपंचायत सदस्य, धनेगाव, ता. सेलू, जि. परभणी यांनी सरपंच धनेगाव, ता. सेलू, जि. परभणी यांच्या विरुध्द दिनांक ०६/११/२०२३ रोजी पारीत केलेला अविश्वास ठराव वैध ठरविण्यात येऊन कायम करण्यात येतो.