आपला जिल्हा

 शहरातील पथदिवे तात्काळ सुरू करा नसता जलसमाधी आंदोलनाचा इशारा

सेलू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 बी वरील पथदिव्या बाबत मुख्याधिकारी यांना निवेदन

सेलू ( प्रतिनिधी ) मुख्याधिकारी सेलू यांना दिलेल्या निवेदनात सेलू शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 बी वरील पथदिवे मागील सहा महिन्यापासून बंद आहेत यामुळे अपघात होऊन लोक जखमी होत आहेत राष्ट्रीय महामार्ग 548 इंजिनियर ला विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्ही मागच्या सहा महिन्यात नगरपालिका सेलू सोबत पथदिवे सुरू करण्यासाठी व हस्तांतरित करून घेण्यासाठी चार वेळेस पत्रव्यवहार केलेला आहे पण नगरपरिषद सेलू कडून काहीही प्रतिसाद अजून मिळाला नाही. यात काय तथ्य आहे ते नगर परिषद व राष्ट्रीय महामार्ग या दोन कार्यालयालाच माहित. राष्ट्रीय महामार्ग व नगरपरिषद सेलूच्या आडमुठे धोरणामुळे सेलू तालुक्यातील रहिवाशांचा जीव रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे धोक्यात आला आहे व या मार्गावर रात्रीच्या वेळेस अंधार असल्यामुळे वारंवार अपघात होत आहे तसेच या मार्गावरून शिकवणीला जाणारी मुले तरुणी व वाकिंग ला जाणारी वयस्कर लोक या सर्वांना दोन्ही विभागाच्या आड मुठे धोरणामुळे धोका निर्माण झाला आहे. तरी येत्या ९-०९-२०२४ सोमवार पर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे सुरू करण्यात यावे नसता सेलू वासिया तर्फे मोरेगाव येथील दूधना नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात येईल व यात काही बरे वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग व नगरपरिषद सेलु यांच्यावर राहील याची नोंद घ्यावी. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी जयसिंग शेळके, नवनाथ गायकवाड, गणेश सोळंके, आण्णासाहेब शिंदे, वैभव कदम, आबासाहेब खरात, मारोती ढोले, महादू नजान उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!