आपला जिल्हा

मुलांच्या संस्कार व शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव द्यावा – डॉ.सौ.सुवर्णा अशोक नाईकनवरे

नूतन पूर्व प्राथमिक बालवाडीचे स्नेहसंमेलन उत्साहात

सेलू ( प्रतिनिधी ) मुलांच्या संस्कार व शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव द्यावा असे प्रतिपादन डॉ.सौ.सुवर्णा अशोक नाईकनवरे यांनी नूतन पूर्व प्राथमिक विभाग बालवाडी स्नेहसंमेलन प्रसंगी केले.

व्यासपीठावर अध्यक्ष मा.श्री राजेशजी गुप्ता,प्रमुख पाहुण्या डॉ.सौ.सुवर्णा अशोक नाईकनवरे काळे(एम.एस. स्त्री रोगतज्ञ) तसेच संस्था अध्यक्ष मा.डॉ.सत्यनारायणजी लोया,मा.श्री मकरंद दिग्रसकर,मुख्याध्यापक श्री.सुखानंद बेंडसुरे,श्री.रमेश काळे, पर्यवेक्षिका श्रीमती छाया बोबडे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ.आरती काळे आदीची उपस्थिती लाभली. पर्यवेक्षिका श्रीमती छाया बोबडे यांनी प्रास्ताविक केले सौ.सुनिता देवकर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले, पाहुण्यांचा परिचय सौ.अनुपमा नाटकर यांनी करुन दिला. सुरुवात चिमुकल्यांच्या स्वागत गीताने झाली. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतामध्ये ‘पालकांनी आपल्या लहान मुलांच्या संस्कार व शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देवून संधी उपलब्ध करून द्याव्यात असे सांगितले’.पाहुण्यांच्या हस्ते महिला पालक स्पर्धा, विद्यार्थ्यी गुणवत्ता पारितोषिक व विविध क्रीडा स्पर्धा व अभिनयातील बक्षिसांचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ मनिषा बायस यांनी केले आभार सौ.संध्या कुलकर्णी यांनी मांडले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बालवाडीताई व बालवाडी सेविका तसेच पालकांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!