आपला जिल्हा

सेलू तालुका डॉक्टर असोसिएशन विरुध्द मेडिकल असोसिएशन मध्ये रंगला क्रिकेटचा सामना

सेलू ( प्रतिनिधी ) डॉ. संजय दादा रोडगे मित्र मंडळ आयोजित रोडगे प्रीमियर लीग मध्ये आज दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एक आगळावेगळा सामना खेळविण्यात आला. यामध्ये सेलू तालुका डॉक्टर्स असोसिएशन विरुद्ध मेडिकल असोसिएशन दरम्यान हा सामना झाला.


सेलू तालुका मेडिकल असोसिएशन प्रथम फलंदाजी करत संदीप टाक, प्रेम कुमार चव्हाण, स्वप्निल जाधव, मुकेश खेडेकर,चंद्रकांत गटकळ, सतीश मुरकुटे, आप्पा सोळंके, तौशिफ इत्यादींनी चमकदार कामगिरी दाखवत आठ षटकांमध्ये मध्ये 71 धावा केल्या. डॉक्टर्स असोसिएशन तर्फे डॉ. बिनायके, डॉ. अमर घुगे यांनी चिवट गोलंदाजी करत मेडिकल संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.
72 धावांचा पाठलाग करण्यासाठी डॉ.संजय रोडगे, डॉ. नखाते, डॉ.अमर घुगे व डॉ . बिनायके आदींनी अप्रतिम फलंदाजी करत एक षटक शिल्लक ठेवून उत्कृष्ट खेळी करत मेडिकल संघावर वर्चस्व प्रस्थापित करून विजयश्री खेचून आणला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!