आपला जिल्हा

कोलकत्ता येथील घटनेचा सेलूत निषेध

डाँक्टर असोसियशनचे बंद व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

सेल ( प्रतिनिधी ) कोलकत्ता येथील आर जी कार मेडिकल कॉलेज येथील महिला निवासी डॉक्टर सोबत झालेल्या अमानुष कृत्य व निर्गुण हत्येच्या विरोधात कठोर कार्यवाहीची मागणी सेलू डाँक्टर असोसियशनच्यावतिने हाँस्पिटल बंद ठेवून शनिवार १७ रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे करण्यात आली आहे.
९ ऑगस्ट २०२४ रोजी, आर जी कार मेडिकल कॉलेज, कोलकाता येथे एका पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थीनीचा कर्तव्यावर असतांना क्रूरपणे बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या भीषण घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह देशाला धक्का बसला आहे. या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पश्चिम बंगाल पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता आणि प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास ते अयशस्वी ठरले.दरम्यान
१४ ऑगस्ट २०२४ रोजी, आर जी कार मेडिकल कॉलेजला मोठ्या जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यावेळी जमावाने गुन्हा झालेली जागेचीही तोडफोड करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा घटनाक्रम डॉक्टर, विशेषतः महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो.
या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ हिंसाचार विरोधात आम्ही सेलू, डॉक्टर्स असोसिएशन निषेध जाहीर करतो व सर्व देशवासीयांना या गुन्ह्यातील पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांस न्याय मिळवून देण्यासाठी व डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करुन कायद्यात योग्य ते बदल करण्याचा आग्रह केंद्रशासनाकडे करण्यात येत आहे.

यासाठी डाँक्टर असोसियशनचे अध्यक्ष डाँ.ऋतूराज साडेगावकर,डाँ.बाळासाहेब जाधव,डाँ.अशिष मेहता,डाँ.संजय रोडगे,डाँ.सूनिल कूलकर्णी,डाँ.अरविंद बोराडे,डाँ.विजेंद्र नागोरी,डाँ.राजेंद्र गात,डाँ.सूवर्णा नाईकनवरे,डाँ.अनूपमा जवळेकर,डाँ.अश्विनी गायकवाड,डाँ.अनूराग जोगदंड,डाँ.परेश बिनायके यांच्यासह शहरातील सर्व डाँक्टर्स यांनीआपली हाँस्पिटल बंद ठेवून सहभाग नोंदवला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!