आपला जिल्हा

अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी सेलूत काव्य मैफिलीचे आयोजन

सेलू  ( प्रतिनिधी ) येथील आण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने कवी नारायण सुर्वे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नूतन विद्यालयाच्या रा.ब. गिल्डा सभागृहात रविवार ( दि. १८ ) रोजी सायंकाळी सहा वाजता काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. काव्य मैफिलीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.के.डी. वाघमारे हे असतील. सेलू-जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते काव्य मैफिलीचे उद्घाटक होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून किशोर जोशी, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने , डॉ.निर्मला पद्मावत, मंगल जोगदंड यांची उपस्थिती असेल. काव्य मैफिलीत निमंत्रित कवी गौतम सूर्यवंशी, डॉ. अशोक पाठक, दिलीप डासाळकर, संजय विटेकर, प्रभु शिंदे, डॉ. शरद ठाकर, शैलजा वसेकर, माधव गव्हाणे, करूणा बागले, डॉ. जयश्री सोन्नेकर, डॉ. राजाराम झोडगे, संभाजी रोडगे, गोविंद रोकडे, शुक्राचार्य शिंदे, दिलीप दौड, संध्या फुलपगार, अश्विनी विटेकर, अश्विनी घोगरे, मनिषा पांडे, हरिष कवडे, प्रमिला धापसे हे सहभागी होणार असून काव्य मैफिलीचे सुत्रसंचालन सुरेश हिवाळे करणार आहेत. काव्य मैफिलीस उपस्थित राहाण्याचे आवाहन अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!