सेलू ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कला संचलनालय महाराष्ट्र राज्य,कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षा सेलू येथील नूतन विद्यालय केंद्रावर व्यवस्थित सुरू झाल्या.
या केंद्रावर सुमारे 143 विद्यार्थ्यांची एलिमेंट्री या परीक्षेसाठी उपस्थिती होती. आज या परीक्षेचा पहिला पेपर वस्तू चित्र आणि स्मरण चित्र या दोन विषयाचे पेपर संपन्न झाले. तर उद्या संकल्पचित्र आणि भूमिती अक्षरलेखन हे पेपर संपन्न होणार आहेत. दिनांक 26 सप्टेंबर पासून इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा सुरू होणारा असून यासाठी देखील नूतन विद्यालय केंद्रावर 111 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. या परीक्षेसाठी केंद्रप्रमुख तथा नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाटील पर्यवेक्षक रोहिदास मोगल, बोधनापोड सर यांनी परीक्षेस भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या परीक्षेचे सहकेंद्रप्रमुख तथा कला विभाग प्रमुख आर.डी. कटारे, कलाशिक्षक फुलसिंग गावित, परीक्षेचे काम पाहत आहेत.