सेलू ( प्रतिनिधी ) आज ७८ व्या स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे महाराष्ट्र राज्यातुन शिष्यवृत्ती (scholarship )परीक्षेत दुसरा क्रमांक प्राप्त एल के आर रोडगे प्रिंन्स इंग्लिश स्कूल ची विद्यार्थीनी तनिष्का अनंत तेलभरेचा मा. जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे भा. प्र. से. परभणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. प्रताप काळे अप्पर जिल्हाधिकारी,मा. राहुल पाटील, शिक्षणाधिकारी आशा गरुड,ससाणे साहेब ई मान्यवर उपस्थित होते.