आपला जिल्हा

विद्यार्थांना फुलांनी सजवलेल्या कार मध्ये सफर घडवत साजराकेला प्रवेशोस्तव 

सेलू ( प्रतिनिधी ) नवीन शाळा,नवे मित्र आणि नवीन शिक्षक अशा गोंधळून टाकणाऱ्या बालमनाला शिक्षणा बद्दल गोडी निर्माण व्हावी आणि शाळा आपली वाटावी म्हणून (ता.१६) सोमवार रोजी शाळा प्रवेशोत्सवा निमित्ताने सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमापूर येथील पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि रंगीत फुलांनी सजवलेल्या कार मधून गावातून त्यांच्या घरून त्यांना शिकवणाऱ्या त्यांच्या शिक्षिका प्रभावती घुगे यांनी शाळेत चारचाकी गाडीत बसवून शाळेतआणले.

यावेळी मुलांचे पुष्प गुच्छ,पुस्तक व गणवेश देऊन शिक्षिका प्रणिता गाडे यांनी स्वागत केले.तालुका आरोग्य अधिकारी तथा शाळा दत्तक पालक अधिकारी डॉ कृष्णकुमार चौधरी,भालचंद्र देशमुख यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले .यावेळी मुख्याध्यापक डॉ.शरद ठाकर,नारायण आष्टकर,दगडोबा माघडे,पालक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!