आपला जिल्हा

माळी समाज राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद

लातूर ( प्रतिनिधी )   माळी सेवा संघ महाराष्ट्र व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद लातूर यांच्या वतीने आयोजित ६ वा राज्यस्तरीय माळी समाज वधू-वर परिचय मेळावा २०२५ दयानंद कॉलेज सभागृह लातूर येथे उत्साहात पार पडला. यावेळी अनेक विवाहेच्छुकांनी आपला परिचय दिला.

यावेळी विवाहेच्छुकांसोबत पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष मकरंद सावे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विशेष कार्य अधिकारी मधुकर गुंजकर, मदन वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेशकुमार राऊत, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे लातूरचे जिल्हाध्यक्ष तथा माळी सेवा संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष पद्माकर वाघमारे, प्रदेश सरचिटणीस भारत काळे, तुळशीदास गोंदरकर, प्रा. अभिमन्यू पाखरसांगवे, अनिताताई फुटाणे, मायाताई गोरे, पापासाहेब यादव आदी उपस्थित होते. परिचय मेळाव्यासाठी इतर जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने नोंदणी केली होती. यावेळी अनेक विवाहेच्छुक मुला-मुलींनी स्वतः मंचावर आपला परिचय दिला. यावेळी सावे यांनी माळी समाजातील मुला-मुलींनी अधिकाधिक उच्च शिक्षण घ्यावे, चांगले उद्योग, व्यवसाय करावेत आणि समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी मिळून एकत्र काम करावे, असे मार्गदर्शन केले. यावेळी माळी समाजातील उत्कृष्ट कार्याबद्दल धनंजय राऊत, बालाजी चौधरी, सौ. अंजली फासे, अमर बुरबुरे, सोमनाथ खडके, संभाजी माळी आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत काळे यांनी केले. सूत्रसंचालन बालाजी चौधरी यांनी तर आभार दत्तात्रय दापके यांनी मानले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!