आपला जिल्हा

मा.ना.श्री. संजय बाबुराव बनसोडे पालकमंत्री जिल्हा परभणी यांचे हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ

परभणी ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याचा 65 व्या स्थापना दिवसा निमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ दि. 01 मे, 2024 रोजी सकाळी 08.00 वा. प्रियदर्शनी इंदिरा गांधी, स्टेडीयम परभणी येथे मा.ना.श्री. संजय बाबुराव बनसोडे, क्रीडा व युवक कल्याण, बंदरे तथा पालकमंत्री जिल्हा परभणी यांचे हस्ते संपन्न होणार आहे.

तरी परभणी जिल्हयातील सर्व नागरीक व स्वातंत्र सैनिक यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येते की, महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिवसा निमित्त मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आपण मोठया संख्येने प्रियदर्शनी इंदिरा गांधी, स्टेडीयम परभणी येथे सकाळी ठिक 7.45 वाजता उपस्थित रहावे. असे आवाहन श्री. रघुनाथ गावडे जिल्हाधिकारी परभणी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!