आपला जिल्हा

नूतनच्या स्वराज जाधव दहावी परीक्षेत घेतले 100% गुण

नूतन विद्यालयाचा निकाल ८७.३० टक्के

सेलू ( प्रतिनिधी)  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, छत्रपती संभाजी नगरचा फेब्रुवारी मध्ये संपन्न झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवार ( दि. १३ ) रोजी जाहीर झाला. दहावीच्या परीक्षेत नूतन विद्यालयातील विद्यार्थी स्वराज लक्ष्मण जाधव शंभर टक्के गुण घेऊन राज्यात प्रथम आला आहे. तर स्वरा रविंद्र लाटकर ( ९९.६० ), कय्युम करीम सय्यद( ९७.२० ), प्रथमेश अभय सुभेदार ( ९७.२० ), सिध्दांत शेषेराव नागरे ( ९७.०० ) तर विभूती विजयकुमार जामदार प्रशालेतून द्वितीय, तृतीय आले आहेत. नूतन विद्यालयाचा निकाल ८७.३० टक्के लागला आहे. प्रशालेतील २८ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा अधिक गुण तर ११५ विद्यार्थी ७५ टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर बाहेती प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक रोहीदास मोगल, बोधनापोड, शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!