
सेलू 🙁 प्रतिनिधी ) येथील माशाल्लाह हॉल येथे सन 2019 च्या हुजाज यांच्या वतीने 2024च्या हज यात्रेसाठी निघालेल्या भाविकांसाठी एक दिवसीय सेलू येथे आज दिनांक 23एप्रिल 24रोजी दुपारी 3 वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिरात हज यात्रा कशी करावी,. ‘हज यात्रेची तयारी’ या विषयावर हाजी मौलाना तज्जूमल कासमी,मौलाना सादेक सहाब नदवी,मौलाना खाजा यांनी हज उमराहची परिपूर्ण पद्धत या विषयावर तर हाजी मौलाना जाफर हाजरी ए मदीना का हज यात्रेकरूं ना मार्गदर्शन केले.




