आपला जिल्हा

परभणी लोकसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी  महादेव जानकर यांना विजयी करून परिवर्तनाचे साक्षीदार व्हा – रुपालीताई चाकणकर

परभणी ( प्रतिनिधी ) परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मा.महादेवजी जानकर यांच्या प्रचारार्थ राज्याचे  कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ.रूपालीताई चाकणकर यांची सोनपेठ येथील पद्मिनी मंगल कार्यालय  जाहीर सभा  संपन्न.

राज्याला गतिमान करण्यासाठी महायुती वेगाने निर्णय घेवून योग्य ती अंमलबजावणी करीत आहे. त्याला केंद्र शासनाने जोड दिली आहे. त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघाच्या सार्वंगिण प्रगतीला साथ देण्यासाठी आणि मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी महायुतीचे सक्षम उमेदवार महादेव जानकर साहेब यांना विजयी करून परिवर्तनाचे साक्षीदार व्हा, असे आवाहन ना.धनंजय मुंडे साहेब व सौ.रूपालीताई चाकणकर यांनी उपस्थितांना केले.

यावेळी यावेळी राज्याचे कृषीमंत्री मा.श्री धनंजय भाऊ मुंडे, राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, माजी आ. मोहन भाऊ फड, डॉ. केदार खटिंग,जि.प.माजी अध्यक्ष राजेश दादा विटेकर, बाळासाहेब जाधव, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जी राठोड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई विटेकर, जिजाताई राठोड, लक्ष्मीकांत देशमुख, दशरथ पाटील सूर्यवंशी, डॉ. सुभाष कदम, रोहन सामाले, माऊली सरकटे, श्रीकांत विटेकर, रंगनाथ सोळंके, ज्ञानेश्वर दातार, प्रज्ञा खोसरे, भावनाताई नकाते, वंदनाताई खाडे, माधवराव भोसले, रावसाहेब पांडुळे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!