सेलू ( प्रतिनिधी ) दिव्यांग व्यक्ती साठी मतदान कक्षात प्रवेश घेणे सुलभ व्हावे यासाठी नगर परिषद सेलू मार्फत सेलूतील मतदान केंद्रासाठी व्हिल चेअर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
सेलू शहर नगर पालिका क्षेत्रातील मतदान केंद्रावर मतदाना च्या दिवशी सुविधा उपलब्ध.. व्हील चेअर साठी सर्व मतदान केंद्रावर रॅम्प देखील बनविण्यात येणार आहे. त्याच बरोबर संबंधित मतदान केंद्राध्यक्ष यांना प्रत्येकी एक व्हील चेअर देण्यात येणार आहे एकूण 20 व्हील चेअर सेलू नगर पालिकेच्या वतीने उपलब्ध करण्यात आल्या आहेत.