आपला जिल्हा
महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

परभणी, दि. 11 (प्रतिनिधी ) : क्रांतिसूर्य, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नायब तहसिलदार मिनाक्षी तमन्ना, अनिकेत पालेपवाड, दत्ता गिणगिने, प्रा. वामनकुमार वाणी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी – कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
सेलूत विविध सामाजिक संस्था, फुले प्रेमी नागरिकांच्या वतीने फुले नगर सेलू येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
क्रांतिसूर्य, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सेलूत विविध सामाजिक संस्था, फुले प्रेमी नागरिकांच्या वतीने फुले नगर सेलू येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.