आपला जिल्हा

हेमंतराव आडळकर सर्वोत्कृष्ट चेअरमन पुरस्काराने सन्मानित

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष श्री हेमंतराव मुरलीधरराव आडळकर यांना नवी दिल्ली येथील ऑल इंडिया बिझनेस डेव्हलपमेंट ऑफ इंडिया अँड ग्लोबल सोसायटी फॉर हेल्थ अँड एज्युकेशन ग्रोथ

प्रमोटिंग अचिव्हमेंट्स फाउंडेशनच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘बेस्ट चेअरमन परफॉर्मन्स अवॉर्ड फॉर को-ऑपरेटिव्ह बँक डेव्हलपमेंट विथ मेडल’ पुरस्कार 11जानेवारी 24रोजी जाहीर झाला होता तो आज दिनांक 8 एप्रिल 2024 सोमवार रोजी कार्यक्रम दिल्ली येथील कॉन्सीटीयूशेन क्लब ऑफ इंडिया येथील हॉल मध्ये प्रदान करण्यात आला फाऊंडेशनचे प्रमुख प्रा.के. एस. राणा (व्हाईस चान्सलर ऍडव्हाईजरऑफ मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अँड एम्पोर्मेंट).पदमश्री डाँ जितेंद्र सिंग शँटी,( प्रि्सीडेन्ट ऑफ शहीदभगत सिंग सेवादल एस बी एस फौंडेशन ),हरिपाल रावत (जॉईंट सेक्रेटरी .ऑल इंडिया काँग्रेस कमेटी आसाम ).सी. एस.व्ही. एन. बी मूर्ती ट्रेड कमिशनर .(finland ),डाँ सुरेश चंद्र दिल्ली (आय ए एस )यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला होता . या वेळी उपाध्यक्ष श्री चंद्रशेखकर मुळावेकर, दतरावं आंधळे, मु. का. अधिकारी श्री रामराव लाडाने, श्री. शशिकांत कुलकर्णी श्री विलास पौळ उपस्थिती होती,पुरस्काराबद्दल आडळकर यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.ग्राहकांना सेवा व उत्कृष्ट प्रशासन, सामाजिक बाधिलकी जपत श्री हेमंत आडळकर यांच्या कार्यातून दिसून येते त्यांनी सेलू नगर परिषद चे नगराध्यक्ष पद, जिल्हा मध्यवर्ती बँक चे संचालक पद भूषविलेलं आहे संपूर्ण जिल्ह्यात एक चांगली ओळख आहे जिल्हायात साईबाबा नागरी बँक च्या सहा शाखा कार्यरत आहे, या पुरस्कार बद्दल त्याचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!