आपला जिल्हा

विरशैव स्मशान भूमीच्या दुरुस्ती साठी शिवा संघटनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सेलू (प्रतिनिधी ) सेलू येथील सर्व्हेनंबर 33 मधिल विरशैव स्मशान भूमीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून मृतदेहाचा दफनविधी करणे कठीण झाले आहे, त्यामुळे स्मशान भूमीची लेव्हलिंग करून द्यावी अशी मागणी अखिल भारतीय शिवा विरशैव संघटनेच्या वतीने मुख्याधि काऱ्यांना दि 20 जानेवारी रोजी निवेदना द्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की सर्व्हे नंबर 33 मधिल न प च्या विरशैव स्मशान भूमी ची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वाढलेली काटेरी झाडे , चिल्हारीची काटेरी झुडपे , नाल्याचे पाणी घुसल्याने निर्माण झालेली दलदल यामुळे मृतदेहाचा दफनविधी करने जिकीरीचे झाले आहे.
त्यामुळे संबंधित स्मशान भूमीत डोजर अथवा ट्रॅक्टर अर्थमुव्हर च्या सहाय्याने जागेचे सपाटीकरण करून वाढलेली अनावश्यक काटेरी झाडे नष्ट करावी, श्रद्धांजली सभागृहाची स्वच्छता व साफसफाई करावी, तसेच महाराष्ट्र शासनाच्या मुक्तीधाम योजने अंतर्गत विरशैव स्मशानभूमी साठी 2 एकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर शिवा संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष शिवकुमार नावाडे, तालुकाध्यक्ष निजलिंग अप्पा तरडगे , सखाराम कानडे, देवराव चौरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!