आपला जिल्हा

विद्यार्थ्यांनी परिश्रम करून यश संपादन करावे – विनोद बोराडे

⬛ निर्मिक कोचिंग क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

सेलू ( प्रतिनिधी ) विद्यार्थ्यांनी परिश्रम करून यश संपादन करावे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी रविवार दि.31 मार्च रोजी निर्मिक कोचिंग क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी केले.

या वेळी शिवाजी शिंदे,सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, प्रा मदन इदगे, संचालक शुकाचार्य शिंदे, पि.के .शिंदे ,बबन घुले ,बापुराव डाके, हरिभाऊ बरसाले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लासेसचे संचालक शुकाचार्य शिंदे यांनी केले. पि. के.शिंदे यांच्या ‘या झोपडीत माझ्या ‘ या गिताने विद्यार्थ्यांचा मनाचा ठाव घेतला. कार्यक्रमात एस. एस. सी. मार्च 2023 परीक्षेत इंग्रजी विषयात 98 गुण प्राप्त करुन राज्यात तृतीय आणि क्लासमधून प्रथम आलेली त्रिवेणी डाके या विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सानिका तांगडे , नम्रता पवार, पुनम घुले, अंजली साखरे ,रवी जोगडे, ज्ञानेश्वर पौळ, कीर्ती पवार, भक्ती चाफेकर, ज्ञानेश्वरी भगस आदी एस. एस. सी मार्च 2023 या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या वर्षीच्या क्लासेसच्या 1ली ते 10 वीचा बेस्ट स्टुडंट अवार्ड मिळालेले विद्यार्थी सोनाली पवार, विवेक खूपसे, अनुजा नीलवर्ण, संमृद्धी कदम,यशोदा पाटील, निकिता बरसाले, दिव्या जोगडे, नारायण जावळे, प्रज्ञा सूर्यवंशी, स्वस्तिक गोरे, वैष्णवी खुरुसणे, शरद गायकवाड, दुर्गा भिसे, अक्षरा गाडेकर, किर्ती धोंगडे, गौरव भिसे,यश ताठे, कर्तव्य शेळके,करण सौदागर, आदित्य मोरे, वायाळ आरव, तौर आयुष या विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक शुकाचार्य शिंदे, सुत्रसंचलण सतिश बरसाले, तर सुरेश कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी , गिरीश पाईकराव, कमलाकर वायाळ,राम नखाते आदींनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!