सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यात सततची होत असलेली अवैद्य गौणखनिज वाहतूक रोखण्यासाठी सेलू उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी बेधडक कारवाई करत काजळी रोहिना येथील ट्रॅक्टर सेलू तहसील येथे आणून जमा करण्यात आले.
सदरील कारवाई मंगळवार दि. 13 जानेवारी रोजी तालुक्यातील काजळी रोहिना ही धडक कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाहीत जॉन डीअर 5045 कंपनीचे ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली ट्रॅक्टर नंबर MH.28 Bk.8769 जप्त करून तहसील कार्यालय सेलू येथे लावण्यात आली. शैलेश लाहोटी यांच्या बेधडक कारवाईमुळे सेलू तालुक्यातील वाळू माफी यांचे चांगले धाबे दणाणले आहे. सेलू तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे सुरू केले आहे.