आपला जिल्हा

17- परभणी लोकसभा निवडणूक मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

⬛ 2026 पैकी 175 अनुपस्थित होते.तर एकूण 1851 मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

सेलू ( प्रतिनिधी ) 17- परभणी लोकसभा निवडणूक, 2024 च्या कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. सदर कार्यक्रमाप्रमाणे दि 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. जिंतूर विधानसभा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची मतदान  अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. या निवडणूकीबाबतचे प्रशिक्षण जिंतूर येथील औंढा रोडवरील गायत्री लॉन मध्ये घेण्यात आले.

या वेळी निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडनिकी बाबत प्रशिक्षण देतांना व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, सहायक निवडणूक अधिकारी संगीता सानप, श्री. जनार्धन विधाते निवडणूक उप जिल्हाधिकारी परभणी, कच्छवे मॅडम नायब तहसीलदार जिंतूर, श्री मुंढे सुग्रीव नायब तहसीलदार जिंतूर, श्री राजेश सरवदे तहसीलदार जिंतूर, श्री दिनेश झापले तहसीलदार सेलू यांची उपस्थिती होती.
जिंतूर विधानसभा क्षेत्रातील सकाळ व दुपार सत्रात सेलू व जिंतूर तालुक्यातील  2026 पैकी 175 अनुपस्थित होते.तर एकूण 1851 मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

श्री राजेश सरवदे यांनी निवडणूक प्रकियेबाबत तर डॉ संतोष मलसटवाड यांनी EVM बाबत प्रशिक्षण दिले. सर्व मास्टर ट्रेनर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी evm मशीनवर प्रात्यक्षिक करून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!