आपला जिल्हा

कराटे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना बेल्ट वाटप

सेलू ( प्रतिनिधी ) नॅशनल चॅमपीअन शिप
कराटे इगल फाऊंडेशन मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या सेलू शाखेच्या वतीने कराटे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची कलर बेल्ट परीक्षा साई नाट्य गृह च्या प्रगणात दिनांक 9 मार्च 24 शनिवारी नुकतीच संपन्न झाली. असोसिएशनचे प्रमुख फेरोज मास्टर यांनी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सेलू येथील साईबाबा नागरी बँक चे व्यवस्थापक श्री निसार पठाण, सामाजिक कार्यकर्ते श्री इसाक पटेल, रशीद खान इंजिनीअर,नयम पठाण, रहीमखान,पागोटे सर,श्री निवळकर श्री बिराजदार सर, श्री रितेश आठवे रझीककुरेशी, श्री सत्तार अन्सारी, मोहसीन ताबोळी यांच्या हस्ते बेल्ट व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

शालेय मुले आणि मुलींमध्ये स्वतःचे संरक्षण करण्याबाबत आत्मविश्वास, धाडस निर्माण व्हावे, यासाठी इगल फॉउंडेशन परिसरात कराटे प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. यातून प्रशिक्षण घेतलेल्या मुला-मुलींना कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

य लहान मुले आणि मुली स्वतःचे संरक्षण स्वतः करू शकतील या उद्देशाने कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज बनली आहे. माध्यमातून कराटे प्रशिक्षण देऊन अनेक विद्यार्थी घडविले. आज तेच विद्यार्थी अनेक मुला-मुलींना कराटे प्रशिक्षण देऊन धाडसी बनवत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. कराटेमुळे मुलांमध्ये धाडस आणि आत्मविश्वास निर्माण होण्यास मोठी मदत होते धावपळी च्या जीवनात स्वतः ला निरोगी ठेवायचा असेल आणि मुला मुलींनी स्वतः चे रक्षण करायचे असेल तर कराटे प्रशिक्षण नितांत गरज आहे शालेय जीवनात त्यांचा खूप फायदा होतो या वेळी मानवत येथे झाले ल्या नॅशनल चॅम्पयन कराटे च्या विध्यार्थी नी यश स्पादन केले ते मिम खातून,रिम खातून,समर्धी सुरवसे,नेत्रा कर्तृवार,आदर्त पागोटे,यश थोरात,कपिल स्वामी शेख सईद,शेख रेहान यांना सन्मानित करण्यात आले तर

कराटे उत्तीर्ण विद्यार्थी

यलो बेल्ट : पठाण यामिन निसार अहेमद, जहागीर निजाम अली खान, जुनेद निजाम अलिखाण,शेख रेहान,फैज निहाल शेख,अब्दुल बासीद,शेख अबूजर,शेख अफजन,शेख माजेद यांना सन्मानित करण्यात आले या वेळी कार्यक्रम चे सूत्रसंचालन श्री कदम पल्ले सर यांनी केले तर आभार श्री निलेश गोटमुकले यांनी केले या प्रसंगी विद्यार्थी चे पालक उपस्थिती होती

Related Articles

Back to top button
Don`t copy text!