आपला जिल्हा

रोडगे प्रीमियर लीग यशस्वी संपन्न

उत्कृष्ट खेळाडूंची चमकदार कामगिरी- डॉ. रोडगे

सेलू ( प्रतिनिधी ) डॉ. संजय दादा रोडगे मित्र मंडळ, सेलू आयोजित रोडगे प्रीमियर लीग  क्रिकेट स्पर्धा -२०२४ नूतन महाविद्यालय क्रिडांगण, सेलू येथे  दि. 29 जानेवारी 2024 वार सोमवार रोजी अंतिम सामन्यात मॉडर्न सी सी, सेलू 8 गडी राखून रोडगे प्रीमियर लीग चषकावर दावेदार ठरला. तर के एम एस क्रिकेट क्लब संघ उपविजेता ठरला.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ.संजय रोडगे, संचालक कृ.उ.बा.स.सेलू तथा अध्यक्ष, श्रीराम प्रतिष्ठान, सेलू
प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अशोकजी पटवारी, डॉ. सुनील कुलकर्णी, डॉ. अरविंद बोराडे, श्री. भास्करराव पडघन संचालक कृ.उ.बा.स.सेलू, श्री. नागेश कान्हेकर (नाना), श्री. गणेश माळवे, श्री. अर्जुन बोरुळ, श्री. बिरू पोळ, श्री. माऊली पावडे, श्री. विठ्ठल कोकर, श्री. अशोकराव रासे, श्री. गणेश काटकर, श्री. कपिल फुलारी, श्री. दीपक रोडगे, श्री. गणेश रोडगे, श्री. कैलास ताठे, श्री. अन्वर पठाण, श्री. प्रकाश गजमल, श्री. दत्ताराव लाटे, श्री. बाबा गजमल, श्री. सुनील हिवाळे, श्री. कैलास रोडगे, श्री. दुर्गादास आळसे, श्री. शिवाजी सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.
दुपारी तीन वाजता मॉडर्न सीसी विरुद्ध के एम एस क्रिकेट क्लब यांच्यामध्ये अंतिम सामन्यात नाणेफेक के एम एस क्रिकेट क्लब या संघाने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. के एम एस या संघाने 8 षटकात 9 गडी बाद 58 धावा केल्या.

तर मॉडर्न सी सी या संघाने 59 धावांचा पाठलाग करताना 6.4 षटकात 62 धावा 8 गडी राखून रोडगे प्रीमियर लीग RPL चषक पटकावला. सामनावीर पुरस्कार मॉडर्न सी सी संघाच्या मारोती कांबळे यांना देण्यात आला.
प्रथम पुरस्कार मॉडर्न सी सी संघास डॉ. संजय रोडगे यांच्याकडून 41,000/- रोख पारितोषिक व चषक देण्यात आले. व्दितीय पारितोषिक डॉ. संजय रोडगे यांच्याकडून के एम एस क्रिकेट संघास 31000/- हजार व चषक देण्यात आले.
मालिकावीर मॉडर्न सी सी संघाचा मोईज बागवान ठरला. उत्कृष्ट फलंदाज श्री. अजय काष्टे तर उत्कृष्ट गोलंदाज शुभम पवार यांना चषक देऊन गौरवण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय समारोपात बोलताना क्रिकेट प्रेमींसाठी व खेळाडूंसाठी सेलूमध्ये भव्य अशा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे येथील सेलू तालुका तसेच परिसरामधील खेड्यापाड्यातील खेळाडूंना या ठिकाणी आपला उत्कृष्ट खेळ प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व निर्माण करून आपल्या मधील असलेला एक उत्तम खेळाडू कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण याठिकाणी मागील पाच दिवसापासून पहायला मिळाले. याठिकाणी एकापेक्षा एक असे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यांनी चमकदार कामगिरी करून तसेच आपापल्या पद्धतीने आपल्या संघास विजय कसा प्राप्त करता येईल यासाठी सर्वांनीच अतोनात परिश्रम घेतले आहेत. यामधूनच उत्कृष्ट खेळाडू निर्माण होऊ शकतो. असे प्रतिपादन यावेळी डॉ. रोडगे यांनी केले.
गुणलेखक सलमान सिद्दीकी, समालोचक-शेख यासेर, म्याडी यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकिय अधिकारी प्रा. महादेव साबळे, श्री. कपिल ठाकूर, श्री. रवी रोडगे, श्री. गणेश येवले, श्री. अशोक बोडखे, श्री. राजू शेरे, श्री. दशरथ खुडे, श्री. महादेव दवंडे व विट्ठल मामा यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!