आपला जिल्हा

शिवसेना डॉक्टर सेल महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत डेंटल विंग प्रदेश प्रमुख पदी डॉ अनिकेत जोगदंड यांची निवड

सेलू ( प्रतिनिधी ) शिवसेना डॉक्टर सेल महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत डेंटल विंग प्रदेश प्रमुख पदी डॉ अनिकेत जोगदंड यांची नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्तीचा कालावधी तीन वर्षाचा असणार आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण व माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेब व मा. खा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या जनहित कार्याचा प्रचार व प्रसार कराल तसेच पक्षवाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास डॉ. धनंजय गोविंदराव पडवळ प्रदेशप्रमुख डॉक्टर सेल, महाराष्ट्र राज्य यांनी नियुक्ती पत्रात व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!