सेलू (प्रतिनिधी ) येथील श्रीसंत गोविंद बाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी श्री रामनाना पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी श्री मुंजाभाऊ भिसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत श्री रामनाना पाटील यांची सर्वानुमते श्रीसंत गोविंदबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीसाठी संस्थेचे जेष्ठ संचालक श्री जयप्रकाशजी बिहाणी, श्रीबल्लभजी लोया प्राचार्य डॉ.ए.एम.डख, चंद्रप्रकाशजी सांगतानी, सुनीलबापु डख, बंडूनाना कदम ,जीवनअपा तरवडगे ,दिपकराव खराबे , प्रल्हादराव कान्हेकर , प्रफुल्लकुमार बिनायके , नंदकिशोरजी बहिवाल ,चंद्रशेखर नावाडे ,श्री एकनाथराव पौळ यांची उपस्थिती होती. त्यांच्या या निवडी बद्दल सर्व संचालक मंडळाच्या वतीने श्री रामनाना पाटील यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला तसेच कै.सौ.राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी. शिंदे, बी.आर. साखरे ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले . त्यांच्या निवडीचे सर्वक्षेत्रातून स्वागत होत आहे.