आपला जिल्हा

कै. अशोकराव जोगदंड यांचा स्मृतिदिन संपन्न

सेलू ( प्रतिनिधी ) गुरुवार दि.28 डिसेंबर
सेलू येथील राजर्षी छत्रपती शाहू शि. प्र. मंडळ संचलित जिजामाता बालविद्या मंदिर येथे संस्थापक अध्यक्ष कै.डॉ. अशोकराव जोगदंड यांचा स्मृति दिन व यानिमित्ताने घेण्यात आलेल्या आंतर शालेय निबंध स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना बक्षीस वितरण व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


कार्यक्रम अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र पाठक तर प्र प्रमुख अतिथी म्हणून कन्या केंद्राचे केंद्रप्रमुख श्री एकनाथ जाधव, डॉ.अनुराग जोगदंड, निबंध स्पर्धचे परीक्षण करणारे शेख मौजम अब्दुल्ला उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कै. अशोकराव जोगदंड यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पावडे भगवान यांनी केले. स्मृती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीमती ल.ला.रा. नूतन कन्या प्रशालेची *कु.माने प्रगती चक्रधर,* व्दितीय क्रमांक विवेकानंद प्राथमिक शाळा सेलू येथील *कु.होगे संचिता ज्ञानेश्वर* तर तृतीय क्रमांक विभागून श्री के.बा. प्राथमिक सेलूचा चि .*तळेकर योगेश पारस व जिजामाता प्राथमिक शाळेची *कु.धबडगे पूनम महेंद्र* यांनी यश संपादन केले, या स्पर्धेत नूतन कन्या, शारदा, श्री के.बा., विवेकानंद, एकलव्य, जिजामाता, यशवंत प्राथमिक शाळेने सहभाग नोंदवला.
प्रमुख अतिथी केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, शेख मोजम सर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह रोख बक्षीस व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. अध्यक्षीय समारोप करतांना मुख्याध्यापक रविंद्र पाठक यांनी कै.अशोकराव जोगदंड यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
यावेळी नूतन कन्या प्रशालेचे भालचंद्र गांजापुरकर यांनी शाळेच्या ग्रंथालयास ₹ 1100/- भेट मुख्याध्यापक यांचेकडे सुपूर्द केली. तसेच कार्यक्रमास रुपाली साडेगावकर, विजय चौधरी, महेंद्र धबडगे आदी उपस्थित होते. कार्यक्रम सूत्रसंचलन मंगेश शेळके तर आभार कृष्णकांत खापरखुंटीकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री कटारे विष्णू, , बाळु धनवे, सादेखा तसेच तुकाराम अंभूरे यांनी परिश्रम घेतले, खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!