आपला जिल्हा

सावित्रीच्या कार्याचा वसा महिला युवतीने पुढे नेला पाहिजे – सौ अस्मिता मोरे

⬛ सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती उत्साहात साजरी

सेलू ( प्रतिनिधी ) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 193 व्या जयंती निमित्त सेलू येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना सेलू पोलीस स्टेशनच्या दामिनी पथक प्रमुख अस्मिता मोरे म्हणाले की सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करून मुलींना शिक्षण प्रवाहात आणले व त्यांचे जीवनमान बदलले त्यांच्या या कार्याचा वसा महिलांनी व युतीने पुढे न्यावा असे प्रतिपादन केले.

http://https://youtu.be/fMoFWix5tGc?si=0Un7_uayTCnuWAP7

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समता परिषद जिल्हा कार्याध्यक्ष परभणी नानासाहेब राऊत यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून सो अस्मिता मोरे, बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा कौसडीचे सरपंच मोबीन कुरेशी, भाजपा सेलू शहराध्यक्ष अशोक अंभोरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक उफाडे, दिलावर शेख यांची उपस्थिती होती.

सावित्रीची लेक अस्मिता मोरे यांचा सन्मान

 

सेलू पोलीस स्टेशनच्या दामिनी पथक प्रमुख सौ अस्मिता मोरे यांच्या सेलू शहरातील कार्याबद्दल त्यांचा सावित्रीची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
नानासाहेब राऊत यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की जसे महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुले यांना पुढे करून महिला शिक्षणाचा मार्ग मोकळा केला त्याचप्रमाणे आपल्या समाजाने देखील प्रत्येक ठिकाणी महिलांना पुढे करून त्यांना न्याय देण्याचे काम करावे व सावित्रीबाई फुले यांचे कार्य घराघरात पोहोचण्याचे काम करावे.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर कटारे यांनी केले तर आभार प्रभाकर इंगळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एडवोकेट प्रभाकर गिराम, भुजंग थोरे, महादेव गायके,विठ्ठल कोकर, महादेव गायके, सचिन कोरडे, कुराडकर,उल्हास नाईकनवरे, जगाडे पंडितराव,पाडुरंग वाढवे रासवे पंडित, तरासे पाटील,तहेसीन देशमुख, रवी दळवे,सुदर्शन कटारे चव्हाण प्रकाश. कार्तिक श्रावणे . प्रथमेश इंगळे राजेभाऊ मोगरे सौ कविता कटारे सौ इंगळे उर्मिला सौ रासवे मनकार्णा यांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!