आपला जिल्हा

शैक्षणिक क्षेत्रात श्रीराम प्रतिष्ठानचे मोलाचे योगदान – मा.आ. रामप्रसादजी बोर्डीकर

एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या "ट्रान्झिशन अ चेंज इन वर्ड" सांस्कृतिक कार्यक्रमाने सेलूकरांची मने जिंकली

सेलू  ( प्रतिनिधी ) 27 डिसें. येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सुरभी महोत्सव अंतर्गत एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी “ट्रान्झिशन अ चेंज इन वर्ड ” या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम शाळेच्या विद्याविहार संकुलात सादर करण्यात आला. मूल्यसंस्कार, भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सेलू-जिंतूर मतदार संघाचे माजी आमदार श्री. रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे, उपशिक्षणाधिकारी परभणी मा. श्री गजानन वाघमारे, मंठा तालुक्याचे पीआय मा. श्री. बालाजी गायकवाड, संचालक कृ. उ. बा. स. सेलू श्री. रामेश्वर राठी, श्री. अजय डासाळकर, श्री. भास्कर पडघन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो. सेलू अध्यक्ष श्री. संदीप टाक, ॲड. गिरीश साडेगावकर, दैनिक लोकमत तालुका प्रतिनिधी श्री. मोहन बोराडे,  दैनिक भास्कर प्रतिनिधी मोहम्मद इलियास, डॉ. भक्ती नंद, डॉ. दत्तात्रय काकडे, डॉ. प्रविण सानप, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलचे प्राचार्य प्रगती क्षीरसागर, कार्तिक रत्नाला यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणाऱ्या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात पारितोषिक वितरणाने झाली. यावर्षी दहावी वर्गातून *चि.वरद कदम “प्रिन्स ऑफ द स्कूल” तर इशिका पवार “प्रिन्सेस ऑफ द स्कूल”*  या पुरस्काराने त्यांच्या पालकांसमवेत मा आ. रामप्रसादजी बोर्डीकर व डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावर्षी पेरेंटस ऑफ द इयर कीर्ती खजिने -राऊत यांना मिळाला. माजी विद्यार्थी कू. गार्गी ढालकरी(आय.आय. टी.कानपुर ) व दहावी परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम कु .समृद्धी काकडे यांचाही सत्कार करण्यात आला.यासोबतच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थी चि. अजित झाडे, चि. आरुष कावळे, चि. साहिल राठोड या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालक व मार्गदर्शक विज्ञान शिक्षक समवेत लेट काशीबाई रामराव रोडगे अवॉर्ड देऊन सत्कारित करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिले जाणारे मानाचे पुरस्कार लेट रंगाचार्य गुरुजी अवार्ड कु. तनिष्का तेलभरे, चि. अथर्व नंद, लेट. पंढरीनाथराव रोडगे अवॉर्ड गौरी अबुज, चि. तेजश्री चौधरी, कु. खुशी मानधने, दत्तात्रय अरगड अवॉर्ड कु. समृद्धी सुरवसे,चि. प्रज्वल रोडगे, लेट नागनाथ आप्पा मलवडे अवार्ड  कु. गौरी अबुज, लेट काशीबाई रामराव रोडगे अवार्ड कु. श्रुती हाडोळे, समृद्धी काकडे, लेट लक्ष्मीबाई पंढरीनाथराव रोडगे अवार्ड चि. विजन खाडे, तत्वमशी शिंदे व लेट कमलाबाई इंद्रचंदजी विनायके अवार्ड ओम साई विकास कदम या विद्यार्थ्यांना मिळाला.
या दरम्यान आपल्या पाल्याला स्टेजवर पाहण्यास पालकांचा उत्साह तितकाच शिगेला पोचला होता. गणेशस्तुतीने दमदार सुरुवात झाल्यानंतर एकाहून एक फ्युजन डान्स सादर करून मुलांनी अक्षरक्षः वेडावून सोडले.या सांस्कृतिक कार्यक्रमात बालकलाकारांनी गणेश वंदना, मिक्स सॉंग, अपने तो अपने होते हैं यासोबत गुरुकुल पद्धती व आधुनिक पद्धती मध्ये बदल,लोकमान्य तिलकांचा गणेशउत्सव, फेसबुक, इंस्टाग्राम सोशल नेटवर्किंग चा विद्यार्थ्यांच्या मनावर घातक परिणाम, पंढरपूर चा पालखी सोहळा, देशभक्ती पर भावना, महाभारत द्रोणाचार्य व एकलव्य ची गोष्ट ई थीम सॉंग आधारित समूह नृत्य बालकलाकरांनी नी सादर करून प्रेषकांची मने जिंकली व दाद मिळवली.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी—विद्यार्थीनींनी विविध प्रकारची ज्या त्या गीताला साजेल अशी वेशभूषा परिधान करून आपआपले गीत सादर करून आपल्यात दडलेल्या सुप्त अशा कलागुणांचे दर्शन उपस्थितांना करून दिले. यावेळी त्यांनी सादर केलेल्या कलागुणांना मोठ्या प्रमाणात दाद मिळाली. या वार्षिक स्नेहसंमेलनास मोठ्या संख्येने पालक वर्ग तसेच सेलू तील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी प्रिंसिपल प्रगती क्षीरसागर यांनी शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला.
डॉ संजय रोडगे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई अभ्यासक्रमाची मान्यता आणली, जागतिक दर्जाची शाळा उभारून, अत्यल्प फीसमध्ये या ठिकाणी शिक्षण ज्ञानदानाचे काम होत आहे. ही खूप कौतुकाची बाब आहे. असे आपल्या भाषणात मंठा तालुक्याचे पीआय श्री बालाजी गायकवाड साहेब यांनी सांगितले.
उदघाटन पर भाषणात मा आ. श्री रामप्रसादजी बोर्डीकर यांनी अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर ही संस्था काम करत आहे. या शाळेत विविध नवीन्यपूर्ण उपक्रम डॉ. संजय रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जातात. डॉ साहेब हे विद्यार्थ्यांशी खूप सलग्न आहेत. शाळेतील विद्यार्थी आज आय आय टी, डॉक्टर्स, इंजिनियर्स, भारतीय सेवेमध्ये लेफ्टनंट कर्नल होत आहेत. असा शाळेचा अध्यक्ष कुठेही पाहायला मिळत नाही. जो विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देतो. डॉ रोडगे हे सेलू तालुक्याचेच नाहीतर परभणी जिल्ह्याचे शिक्षण सम्राट आहेत. असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे उदघाटक मा. आ. श्री. रामप्रसादजी बोर्डीकर साहेबांनी मनोगत व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे काम या सुरभी महोत्सवातून करीत असल्याचे दिसून येत आहे. संस्काराची जडणघडण कश्यापद्धतीने करावयाची हे या शाळेतून दिसते, असे प्रतिपादन उप शिक्षणाधिकारी श्री गजानन वाघमारे यांनी केले.
‘‘विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम एल.के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल नेहमीच करत असते,’’ असे मनोगत श्री मोहन बोराडे यांनी व्यक्त केले.
दर वर्षी होणारे सुरभी महोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन हे सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची भविष्यातील दिशा ठरवते.सेलूकरांसाठी हा सुरभी महोत्सव पर्वनी असते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात हे स्नेहसंमेलन मोलाचा वाटा उचलते.असे प्रतिपादन मोहम्मद इलियास यांनी केले.
आज श्रीराम प्रतिष्ठान अंतर्गत सर्वच क्षेत्रात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व यशस्वी होत ही सेलूवासि्यांसाठी खुप अभिमानाची बाब आहे. हा सुरभी महोत्सव केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले आहे. आजचा सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्मुख करणारा आहे. असे आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. संजय रोडगे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रीना ठाकूर, सौ . ममता सिंग, सौ. कल्पना भाबट यांनी केले तसेच आभार कार्तिक रत्नाला यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेकरिता श्रीराम प्रतिष्ठान मधील नृत्य दिग्दर्शक श्री. मिलिंद खंदारे, श्री. सतीश धोत्रे, गीतांजली घनेलू व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!