आपला जिल्हा

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणास प्रतिसाद

--शिक्षक सेनेच्या पाठवुराव्याला यश

परभणी (प्रतिनिधी ) दि 27 येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ परिसरात जिल्हाभरातील शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण सुरू आहे.या प्रशिक्षणास शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आज.सेवेची 12 वर्ष व 24 वर्ष पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात येते.2 जून ते 12 जून दरम्यान आधी हे प्रशिक्षण झाले होते.परंतु काही कारणास्तव या प्रशिक्षणास अनुपस्थित शिक्षकांच्या अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला.

तसेच शिक्षक सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे यांनीही पुन्हा प्रशिक्षण घेण्यासाठी पाठपुरावा केला.याला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पहिली नोंदणी केलेल्या शुल्कातच अनुपस्थित शिक्षकांसाठी पुन्हा प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.दि 25 ओक्टॉबर ते 3 नोव्हेम्बर दरम्यान हे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या नियोजनाखाली सुरू आहे.या प्रशिक्षणात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ प्रल्हाद खुणे,जेष्ठ अधिव्याख्याता डॉ गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे.विशेष म्हणजे प्राचार्य डॉ खुणे व डॉ गणेश शिंदे हे स्वतः पूर्णवेळ प्रशिक्षणस्थळी उपस्थित राहून स्वतः तासिका घेत आहे.या प्रशिक्षणासाठी प्रभाकर नालंदे,रावसाहेब सावंत,किरण रणवीर,दिगंम्बर गिरी,संदीप आदमाने,रवींद्र हनुमंते,संजीवकुमार सूर्यवंशी,अनिल जाधव,अभिजित कोरान्ने,दीपक सोळंके,किसन बनसोडे,महादेव लोखंडे,अंजली सावरगावकर,अनिल जाधव,दीपक रणदिवे,प्रमोद गोदाम आदी सुलभक म्हणून काम करत आहेत.सध्या या प्रशिक्षणासाठी जवळपास 150 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असून अतिशय चोख नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ प्रल्हाद खुणे व जेष्ठ अधिव्याख्याता डॉ गणेश शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!