आपला जिल्हा

भांबळे बोर्डीकर यांच्या पारंपारीक लढतीत नागरे यांच्या उमेदवारीने निवडणूक रंगतदार

१७ उमेदवार मैदानात उतरल्याने कोण मारणार बाजी

सेलू ( प्रतिनिधी ) जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (sp) गटाकडून माजी आमदार विजय भांबळे,भारतीय जनता पार्टी कडून विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांच्यात होणाऱ्या पारंपारीक लढतीत वंचित बहुजन आघाडी कडून पहिल्यांदा सुरेश नागरे यांच्या उमेदवारीने जिंतूर सेलू विधानसभा निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा मतदार संघात होत आहे.

या मतदार संघात बोर्डीकर आणि भांबळे या दोघांमध्ये हमेशा काटेरी सामना होत असताना या वेळी मात्र सुरेश नागरे मैदानात उतरल्याने गणिते बदलतात की पारंपरीक लढत पुन्हा होते याकडे मतदार बारकाईने अभ्यास करत आहेत.

जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात ४१ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते. मात्र सोमवार ४ नोव्हेंबर रोजी २४ उमेदवारांनी माघार घेतल्याने १७ उमेदवार मैदानात उतरले आहेत. खरी लढत भाजपाच्या विद्यमान आ. मेघनाताई बोर्डीकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आ. विजय भांबळे आणि वंचित बहुजन आघाडीचे सुरेश नागरे यांच्या तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहे.

नामनिर्देशन पत्र माघार घेण्याच्या दिवशी तब्बल २४ उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतल्याने आता १७ उमेदवार नशीब अजमावत आहेत. विद्यमान आ. मेघना बोर्डीकर, माजी आ. विजय भांबळे आणि सुरेश नागरे या तीन उमेदवारांमध्ये खरी तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहे यात शंका नाही.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!