आपला जिल्हा

नूतन सर्वांगीण व्यक्तिमत्व घडविणारी शाळा – डॉ. अपूर्व देशपांडे

सेलू ( प्रतिनिधी ) नूतन विद्यालय ही सर्वांगीण व्यक्तिमत्व घडविणारी शाळा आहे. शाळेत होणाऱ्या व्याख्यान, कला, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध सहशालेय उपक्रमातून खूप काही शिकायला भेटते. असे प्रतिपादन डॉ. अपूर्व देशपांडे ( पुणे ) यांनी केले. ते नूतन विद्यालयातील इयत्ता दहावीतील प्रावीण्य प्राप्त, विविध स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमात प्रशालेच्या कै.राजेंद्र बन्सीलालजी गिल्डा सभागृहात बुधवार ( दि. २७ ) रोजी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम. लोया होते. तर व्यासपीठावर चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, शालेय समिती अध्यक्ष सीताराम मंत्री, कार्यकारिणी सदस्य दत्तराव पावडे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष आरती पांडव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी तथा प्रसिद्ध यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ.अपूर्व देशपांडे ( सह्याद्री हॉस्पिटल, पुणे) पुढे बोलताना म्हणाले की, ‘ जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या उपक्रमात सहभागी झाले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्याला जे काम करायचे आहे ते मन लावून, प्रामाणिकपणे केले पाहिजे. नियमित व्यायाम करा. आपले शारीरिक, मानसिक आरोग्य जपा. तरच आपण जीवनात मोठे होते.’ असेही ते म्हणाले. डॉ. अपूर्व देशपांडे यांच्या हस्ते प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा नूतन विद्यालय शिक्षण संस्था गुणवत्ता सन्मान पारितोषक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नारायण सोळंके यांनी केले. संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे आणि गीतमंचच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. सुत्रसंचलन राजेंद्र सोनवणे, उपमुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक देविदास सोन्नेकर, किशोर कटारे, विजेंद्र धापसे यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन अशोक लिंबेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय बाबासाहेब हेलसकर यांनी करून दिला. तर आभार प्रदर्शन परसराम कपाटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!