सेलू ( प्रतिनिधी ) दि 04. श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू येथे डॉ सुनील मोडक असोसिएट प्रोफेसर बी आर कॉलेज परभणी यांचे गेस्ट लेक्चर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून दहाविच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाच्या गेस्ट लेक्चर चे आयोजन डिसेंबर महिन्यात करण्यात येते. याही वर्षी गेस्ट लेक्चर सिरीज आज जीवशास्त्र विषयाचे तज्ञ प्रोफेसर डॉ सुनील मोडक यांनी लाइफ साइन्स यां विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सोबत नीट, सीईटी या परीक्षेतील जीवशास्त्र विषयाचे महत्त्व सांगितले तसेच जीवशास्त्र विषयातील अडचणीचे शंका समाधान केले.जीवशास्त्र विषयातील पुढील करियर संधी यां विषयी सुद्धा माहिती दिली. शाळेतील विद्यार्थ्यांना अतिरिक्त ज्ञान मिळावे यां संकल्पनेतून गेस्ट लेक्चर चे आयोजन डॉ. संजय रोडगे करत असतात. याप्रसंगी डॉ. संजय रोडगे यांनी डॉ. सुनील मोडक यांचा सत्कार केला. सोबत शाळेचे प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर हे उपस्थित होते.