आपला जिल्हा

शासन आपल्या दारी कार्यक्रमात महारोजगार मेळाव्यात एकूण 52 उमेदवारांची निवड

परभणी, दि. 28 ( प्रतिनिधी ) : ‘योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी’ या मोहिमेतून राज्य शासनाच्या शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात 52 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. हा महारोजगार मेळावा नुकताच ग्रीष्म वस्तीगृह समोरील मैदान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे संपन्न झाला.

महारोजगार मेळाव्यात राज्यातील 9 नामांकित मोठे उद्योजक, कंपन्यांनी उपस्थिती नोंदविली. या ठिकाणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेराजगार उमेदवारांनी उस्फूर्त प्रतिसाद देवून सहभाग नोंदविला. सहभाग नोंदविलेल्या 1,690 सुशिक्षित बेराजगार उमेदवारांपैकी 250 उमेदवारांची प्राथमिक निवड व 52 उमेदवरांची अंतिम निवड उद्योजक, कंपन्याद्वारे करण्यात आली आहे.
अंतिम निवड झालेल्या 52 उमेदवारांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातनिधीक स्वरुपात 5उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तिक व्याज परतावा योजनेअंतर्गत एकूण 2 लाभार्थ्यांना अनुक्रमे 2 व 2.5 लाख रुपये व्याज परताव्याचे धनादेश देण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी दिली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!