आपला जिल्हा
खेळाडूंनी आरोग्य व शिक्षण सांभाळत खिलाडू वृत्तीने खेळत राहावे -डॉ. मनोज रेड्डी
नूतन महाविद्यालय, सेलू येथे स्वा. रा. तीर्थ विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धा संपन्न

सेलू, ( प्रतिनिधी ) दि 18 ऑक्टोबर खेळाडूंनी पोषक आहार घेणे अत्यंत आवश्यक असून, खेळासोबत शिक्षणाकडे देखील गांभीर्याने लक्ष देण्याची आज आवश्यकता आहे. आरोग्य व शिक्षणाकडे दुर्लक्ष करून विद्यार्थी सर्वोत्तम खेळाडू होऊ शकत नाही असे प्रतिपादन डॉ.मनोज रेड्डी(क्रीडा संचालक,स्वा.रा.तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड)यांनी केले.




