सेलू ( प्रतिनिधी ) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 193 व्या जयंती निमित्त बुधवार दिनांक 3 जानेवारी रोजी अभिवादनाचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता इंगळे कॉम्प्लेक्स परभणी रोड सेलू येथे ठेवण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब राऊत समता परिषद कार्याध्यक्ष परभणी तर सत्कारमूर्ती म्हणून सावित्रीच्या कार्याचा आदर्श घेऊन यश संपादन करणाऱ्या सेलू पोलीस स्टेशनच्या दामिनी पथक प्रमुख सौ अस्मिता मोरे यांची उपस्थिती राहणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.