आपला जिल्हा

  सेलू रेल्वे स्टेशन वर जनशताब्दी  एक्सप्रेसचे होणार स्वागत

⬛ सेलू रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आल्याने रेल्वेप्रवास्यामध्ये आनंदाचे वातावरण

सेलू ( प्रतिनिधी ) उद्या सेलू रेल्वे स्थानकावर जनशताब्दी एक्सप्रेस चे स्वागत करण्यात येणार असल्याने सेलू शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाकडून सेलू रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आल्याने सेलू शहरातील तथा तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून यानिमित्त उद्या दिनांक 14 मार्च रोजी सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी जनशताब्दी एक्सप्रेस चे आगमन होताच या एक्सप्रेसला फुलांच्या माळा घालून चालकांचा सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती मराठवाडा रेल्वे प्रवासी संघ,सेलू यांनी कळवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!