आपला जिल्हा

संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचे थाटात उद्घाटन.

सेलू (प्रतिनिधी) 30 डिसेंबर सेलूभुषण कै.हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, डॉ.विनायकराव कोठेकर, गोविंदभाऊ जोशी,रामराव रोडगे,अशोकनाना काकडे,संतोष कुलकर्णी,माजी प्राचार्य शरद कुळकर्णी, यशवंतराव चारठाणकर,महेश खारकर,मोहन खापरखुंटीकर,अजित मंडलिक, श्रीकांत उमरीकर,मल्हारीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

मान्यवरांच्या हस्ते कै. हरिभाऊ काकांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक महेशराव खारकर यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयश्री सोन्नेकर यांनी केले.

प्रारंभी जेष्ठकवी गौतम सुर्यवंशी लिखित तर शांतीभुषण चारठाणकर यांनी स्वरबद्ध केलेले “सूर ज्यांचा श्वास होतो,संगीताची साधना” स्वागतगीत श्रृती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थीवृंदाने सादर केले. संगीत संमेलनाची सुरूवात ऐनोद्दीन वारसी यांच्या बासरी वादनाने झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!