आपला जिल्हा

हतनूर येथे आर्थीक साक्षरता व पिक कर्ज नुतणीकरण मेळावा संपन्न

⬛ भारतीय स्टेट बँक कृषी वाणिज्य शाखा सेलू चा उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी ) आज दि. 01 फेब्रुवारी गुरुवार रोजी मौजे हातनुर येथे भारतीय स्टेट बँक कृषी वाणिज्य शाखा सेलु ने हातनुर येथील शेतकरी बांधवासाठी आर्थीक साक्षरता व पिक कर्ज नुतणीकरण मेळाव्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमास भारतीय स्टेट बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक सम्राट पुरकायस्त, जिल्हा अग़्रणी बँकेचे प्रबंधक उदय कुलकर्णी, आर्थीक साक्षरता समनवयक सुनिल हटेकर, वित्तिय समावेशन अधिकारी जितेश मोरे, भारतीय स्टेट बँकेचे शाखा प्रबंधक अनंत घावडे, कृषी अधिकारी शशिकांत पालेपवाड, उप प्रबंधक श्री. प्रविण जायभाये, व बँक कर्मचारी रवि घनसावद, उन्मेश मस्के, कैलास नजान, तालुका व्यवस्थापक पंचायत समितीचे राजेश्वर श्रावणे, पे पाईट कंपनीचे विभाग प्रबंधक, सेव सोलुशनचे विभाग प्रमुख रवि कदम, व हातनुरचे सरपंच महेन्द्र गाडे, बाळासाहेब आंधळे हातनुरकर, पोलिस पाटील बबनराव पारवे नारायण निर्वळ आणि आदी गावकरी उपस्थित होते.

भारतीय स्टेट बँकेच्या सहाय्यक महाप्रबंधक सम्राट पुरकायस्ता यांनी शेतकऱ्यांना पिक कर्ज नुतणीकरन केल्यास शेती पुरक व्यवसायासाठी कर्ज, बागायती शेती करण्यासाठी पाईपलाईण कर्ज, टीबक कर्ज, बेरोजगारांसाठी व्यवसाय करण्यासाठी, लघु उद्योग कर्ज, शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज, बचत गट कर्ज, व विविध ४० योजनाच्या लाभ मिळतो या बद्दल माहिती दिली
तसेच सुनिल हट्टेकर यांनी सर्व शेतकऱ्यांना आपली पत निर्माण करण्याचे अव्हाण केले त्यासोबत केन्द्र शासनाच्या वित्तिय समावेशक योजना आसलेल्या पंत्रप्रधान जिवन ज्योती योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना पंतप्रधान अटल पेंशन योजना याची माहिती दिली.

बँकेचे शाखाधिकारी अनंत घावडे यांनी शेतकऱ्यांचे प्रगती झाली तर देशाची समृध्दी होईल यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहीजे या साठी सर्वानी बँके सोबत आपली पत निर्माण करुण बँकेच्या व शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेण्याचे अव्हान केले
यासोबतच विविध बचत गटाना कर्ज मंजुरी देण्यात आली व बँके सोबत पत निर्माण केलेल्या व पिक कर्ज नियमिट परतफेड केलेल्या शेतकऱ्यांचा बँकेमार्फत सत्कार करण्यात आला.

सुत्रसंचालन शशिकांत पालेपवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन पविण जायभाये यांनी केले.यावेळी मोठ्या संखेने गावकरी शेतकरी व बचत गटाच्या महीला उपस्थित होत्या.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!