आपला जिल्हा

ईद ए मिलादुन्नबी निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

युथ मोमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वतीने ईद ए मिलादुन्नबी निमित्त उपक्रम

सेलू  ( प्रतिनिधी ) युथ मोमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वतीने ईद ए मिलादुन्नबी निमित्त संपुर्ण महाराष्ट्र राज्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून या निमित्ताने युथ मोमेंट ऑफ महाराष्ट्रा शाखा सेलूच्या वतीने जमात ए हिंद सेलूचे शहराध्यक्ष शेख इमामुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली युथ मोमेंट ऑफ महाराष्ट्रा शाखा सेलूचे शहराध्यक्ष शेख नोमान साखलीन, मोईन सिद्दिकी, शोहेब हाशमी व त्यांच्या युवा सहकारींनी १५ सप्टेंबर रोजी माशाअल्लाह फंक्शन हाॅल, सेलू येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.


रक्तदान शिबीराचे उद्घाटन कुराण पठणाने करण्यात आले. या प्रसंगी १४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबीर यशस्वितेसाठी इब्राहिम बागवान, बिलाल शेख, शजी सिद्दिकी, अमजद बागवान, शेख साजीद, डाॅ. मुताहेर खान, शेख मुखिद, ॲडव्होकेट करीम खान, जब्बार खान, मोहसिन शेख, जुबैद, विखार, जुबेर, अब्दुल मजीद अदिंनी सहकार्य केले‌.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!