आपला जिल्हा

ज्ञानतीर्थ विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची विभागीयस्तरावर निवड

सेलू:( प्रतिनिधी ) परभणी येथे क्रीडा व युवक संचालनालयाने महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू या शाळेतील तीन विद्यार्थ्याची निवड विभागीय स्तरावर झाली आहे.
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातून श्रीकांत गजानन बरसाले याने प्रथम क्रमांक मिळविला, जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातून मयुरी अनिलराव तौर याने द्वितीय क्रमांक मिळविला तसेच योगासन स्पर्धेत १७ वर्ष वयोगटातून आदर्श कुंडलिक बागल याने तृतीय क्रमांक मिळविला. वरील तीनही विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी मिळविली त्याबद्दल त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली. या स्पर्धेकरिता क्रीडा शिक्षक दीपक जोर्गेवर यांचे मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे डॉ. संजय रोडगे, संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके, करणसिंग चव्हाण आदींनी मार्गदर्शक शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!