आपला जिल्हा

केमापूर येथे एक दिवशीय कला कार्यशाळा संपन्न..

सेलू ( प्रतिनिधी ) परभणी येथील होमिओपॅथीक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्यावतीने बालकांचे मोबाईल व्यसन दूर व्हावे व बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी आणि बालकांचा कला विकास मनोरंजक पद्धतीने व्हावा.या उद्देशाने सदरील कार्यशाळेचे आयोजन (ता.९ ) सोमवार रोजी करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक शरद ठाकर,नारायण अष्टकर,दगडोबा माघाडे व कार्यशाळेचे मुख्य प्रवर्तक तथा कला शिक्षक पांडुरंग पाटणकर हे उपस्थित होते. प्रस्ताविक शरद ठाकर यांनी केले. मोबाईल व्यसनापासून दूर राहण्यासाठी व वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.या एकदिवशीय कार्यशाळेत पाटणकर यांनी बालकांच्या आवडी ओळखून विविध खेळ, कागदी वस्तू,हस्तकला, ग्रीटिंग कार्ड,वारली चित्रकला,सुतळी काम,मुखवटे बनवणे, टाळ्यांचे प्रकार या माध्यमातून बालकांचे मनोरंजन केले. यावेळी बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. तल्लीन होऊन शाळेतील मुलांनी कृतीशील सहभाग नोंदविला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रणिता गाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभावती घुगे यांनी केले.कार्यशाळेस होमिओपॅथिक अकॅडमीचे मार्गदर्शक प्रा.शिवा आयथॉल व डॉ.पवन चांडक यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!