महाराष्ट्र

श्री गुरु तेग बहादुर जी साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी वर्षानिमित्त सिडको येथे कार्यक्रम संपन्न

नांदेड  ( प्रतिनिधी) : नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला स्मरण व विचारमंथन कार्यक्रम स्वामी समर्थ मंदिर छ. शिवाजी महाराज संग्रहालय सिडको नांदेड येथे दि. 23 डिसेंबर रोजी भक्तिभावपूर्ण  वातावरणात संपन्न झाला.

या प्रसंगी शहीदी सप्ताह निमित्त गुरुपुत्र चार साहिबजादे, माता गुजरी जी, बाबा मोतीराम जी मेहरा परिवार आदींच्या बलिदानी स्मृतीस अभिवादन करून ‘दूधाचा लंगर प्रसाद’ वितरित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री संत बाबा बलविंदर सिंघ जी यांचे सहकारी यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. स. कुलप्रकाश सिंघ लिखाररी जी यांनी मार्गदर्शन केले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. श्री सतीश कच्छवे हे उपस्थित होते.
वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनात श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या त्याग, आस्था, धर्मस्वातंत्र्य व मानवतारक्षणाच्या मूल्यांवर सखोल प्रकाश टाकला. मानवता, आस्था रक्षणासाठी दिलेले बलिदान हेच त्यांच्या बलिदानाचे खरे महत्त्व असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
त्यांच्या उद्बोधनाने उपस्थित समुदाय गहिवरला. त्यांनी समाजाला आवाहन केले की, श्री गुरु तेगबहादुर साहिबजींच्या वाणीचा उपदेश समजून घ्यावा, श्लेक महल्ला नौंवा चे पठण करावे.
या कार्यक्रमास सिडको , हडको, नवीन नांदेड परिसरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, महिला, युवक, विद्यार्थी तसेच सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी गुरुजींच्या शिकवणीवर आधारित सामाजिक सौहार्द सलोखा, आस्था संरक्षण व नैतिक मूल्यांचे पालन करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आयोजन श्री हनुमान सेवा समिती, नांदेड जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम शांततामय व प्रेरणादायी गंभीर वातावरणात संपन्न झाला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!