सेलू ( प्रतिनिधी ) सेलू नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकित पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सेलू नगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता मिळवत करिष्मा दाखविला आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलिंद सावंत हे निवडून आले त्याच बरोबर भाजप चे 14 नगरसेवक निवडून आणण्यात यश आले. सेलू नगराध्यक्ष पदा साठी भाजपकडून मिलींद सावंत यांची तर काँग्रेस, उबाठा, राष्ट्रवादी आघाडीकडून आत्माराम साळवे मैदान होते. अटीटतीच्या निवडणुकीत भाजप चे मिलिंद सावंत 317 मतांनी निवडून आले. भाजप चे निवडून आलेले उमेदवार काकडे सुनीता सुबोध,बोराडे साईराज मुकेश,रघुवंशी शांताबाई प्रकाशसिह, झमकडे कमल रंगनाथअप्पा, कदम मनीष मुरलीधर, पहाडे आशा नामदेव, सवणे गणेश दत्तात्रय, पठाण तडवी अन्वरखान दिलावर, शेख राहिमा बेगम शेख शफिक, काजळे शिल्पा रामेश्वर,तडवी रहेमत अली खान अजीज अली खान, सोनवणे गयाबाई विठ्ठल राव, सुरवसे प्रभाकर भाऊसाहेब, कोल्हाळ दीपक सखाराम तर काँग्रेस आघाडी कडून निवडून आलेले उमेदवार पवार प्रवीणा संभाजी, धापसे विनोद मधुकर, पठाण मालणबी अफसरखान, मिलिंद मुकुंदराव पवार, आडाळकर महानंदा हेमंतराव,साफिया बेगम अ रशीद, आडळकर पवन हेमंतराव, तर शिवसेना शिंदे यांचे विजयी उमेदवार डॉ. जोगदंड अनिकेत अशोक, काळे सपना हरी, लहाने संदीप हरिभाऊ, देवधर अनुपमा प्रभाकर तर अपक्ष म्हणून फुलारी कपिल शामराव हे निवडून आलेत. पक्षिय बालबल पहिले तर भाजप नगराध्यक्ष 14 नगर सेवक, काँग्रेस आघाडी 07 हरिभाऊ काका लहाने यांची शिवसेना 04 तर 01 अपक्ष.
एकदरीत सेलू नगरपालिकेवर पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आपली एकहाती सत्ता काबीज करून सेलू नगर परिषदेवर पहिल्यांदा बीजेपी चा झेंडा फडकवाला.