सेलू ( प्रतिनिधी) धुरंधर राजकारणी म्हणून सेलू नगर परिषद नवडणुकीत पहिल्यांदाच आपले नशीब अजमावणारे मितभाषी शांत स्वभावतील मिलिंद पवार यांनी काँग्रेस च्या तिकिटावर प्रभाग क्र 8 मधून दिग्गज रणनीतीकार ज्यांच्या राजकारणाची पकड गेल्या पंचवीस वर्षा पासून सर्वपरिचित आहे असे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांना नगर सेवक पदाच्या निवडणुकीत नवख्या उमेदवारा कडून पराभूत व्हावे लागले.
तसे पहिले तर संपूर्ण निवडणूकीचा धुरा स्वतःवर घेऊन प्रत्येक प्रभागात भाजपचा उमेदवार निवडून कसा येईल यांची आखनी करून भाजपाला विजयी करण्याच्या प्रयत्नात त्यांना स्वतःच्या प्रभागात मन्हावं तेवढं लक्ष देता आले नाही. परिणामे त्यांना निवडणुकीत 1016 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी मिलिंद मुकुंदराव पवार यांनी जोरदार मुसंडी मारत सेलू शहरात एका प्रकारे सर्वांना आश्चर्यचा धक्कादेत 1104 मते घेऊन 88 मतांनी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचा पराभव केला. सेलू पालिकेवर सत्ता जरी भाजपची आली असेल परंतु त्यांना मात्र स्वतःला पराभूत व्हावे लागले. सेलू च्या निवडणुकीत भाजपाची सत्ता आली नगराध्यक्ष निवडून आला त्या चर्चे पेक्षा माजी नगराध्यक्ष नवडणुकीत पराभूत का झाले? याचीच चर्चा सेलू शहरात आहे.