सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील खान अब्दुल गफ्फार खान हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आणि बदलत्या परिस्थितीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक वैज्ञानिक उपकरणे सादर करण्याच्या उद्देशाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी खूप मेहनतीने विविध वैज्ञानिक माॅडेल्स तयार करून सादर केले. यात प्रामुख्याने सौर प्रणालीपासून वीज तयार करणे आणि हवेपासून वीज तयार करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम, पाण्याची पातळी दूर करणे, सुर्यग्रहण, चंद्रग्रहण कसे होते, वायू प्रदूषण दूर करणे, कचरा आणि प्राण्यांच्या विष्ठेपासून खत तयार करणे, मानवी ह्रदयाची कार्यक्षमता, आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे माॅडेल इत्यादि ठळक वैशिष्ट्ये होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन जकी अहेमद सिद्दिकी सर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शैलजा शाळेचे मुख्याध्यापक इरफान सर, यासेर शाळेचे शिक्षक खिझर सर, डाॅ. झाकेर हुसैन हायस्कूचे मुख्याध्यापक समीर हाश्मी, उस्मान गणी बॅंकेचे व्तवस्थापक बिलाल हरमैन उपस्थित होते. सदरील प्रदर्शन मुख्याध्यापक मोहम्मद तौखिर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. शाळेतील शिक्षक अब्दुल हमिद अन्सारी, अंसारी मोहसिन, लतीफ, सैफ, नूरसाहब इत्यादिंनी प्रदर्शनाच्या आयोजनात महत्वाची भुमिका बजावली. पालक व इतर शाळेतील विद्यार्थी प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित होते.