सेलू (प्रतिनिधी) नूतन विद्यालय सेलू येथील 16 विद्यार्थ्यांनी होमी भाभा बाल वैज्ञानिक पूर्व परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन द्वितीय स्तरासाठी (Practical Test) निवड झाली आहे.
शाळेतील इयत्ता सहावी विद्यार्थी कु.शब्दा रवींद्र लाठकर कु.धनश्री विलास शेळके, कुआर्या लक्ष्मीकांत कुलकर्णी, चि.स्वराज विजय सोंजे, चि.प्रसाद गोपाल सोनी तर इयत्ता नववी मधून चि. कृष्णा दगडू वाटाणे, कु. मृण्मयी भारत इक्कर, चि. पार्थ विठ्ठल चौधरी,चि. दीपक शत्रुघ्न काष्टे, कु. मैथिली रामेश्वर मोरे, चि. दत्तप्रसाद गंगाधर लवराळे, चि. शिवम सुभाष वैद्य, चि. साईराज अनिल दौड, चि. विनय गणेश बेले, चि.आरीज खान आजेम खान पठाण, चि. अर्णव विशाल क्षीरसागर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, शंकर बोधनापोड यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे विशेष कौतुक करत पुढील टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धा परीक्षा यशासाठी अनंतकुमार विश्वंभर, विभागप्रमुख गोपाल आम्ले, आदिती आंबेकर, अश्विनी पटाईत यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशा बद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया,उपाध्यक्ष डी.के.देशपांडे,सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर सर,सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी यशस्वी विद्यार्थी, त्यांच्या पालकवर्ग व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.