आपला जिल्हा

“मुलींनो सावध राहा,सजग राहा”-मिलिंद पोंक्षे

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी ) ता 10 “विद्यार्थिनींनो सजग व्हा,जागृत व्हा ,बोलायला शिका,नाही म्हणायला शिका,व्यक्त व्हा ,पालकांशी सातत्याने संवाद साधत राहा आणि प्रत्येक गोष्टीकडे जागरूकतेने पहा”. असे प्रतिपादन प्रमुख व्याख्याते मिलिंद पोंक्षे यांनी केले.

पोलीस अधीक्षक कार्यालय ,परभणी यांच्या वतीने आयोजित ‘एक संवाद विद्यार्थ्यांनीशी’ या कार्यक्रमांतर्गत नूतन कन्या प्रशालेत आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते मिलिंद पोंक्षे विद्यार्थिनीशी संवाद साधत होते.
व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती पुंगणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती सोनीत ,दामिनी पथक प्रमुख अस्मिता मोरे,नूतन विद्यालय शिक्षण संस्था प्रशासकीय अधिकारी प्राचार्य शरद कुलकर्णी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा पाटील ,उपमुख्याध्यापक परशुराम कपाटे ,पर्यवेक्षक दत्तराव घोगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमा पूजन आणि पूजा महाजन व संच यांच्या स्वागत गीताने झाली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती सोनीत यांनी केले .याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंगळे यांनीही विद्यार्थिनीशी संवाद साधला.
मिलिंद पोंक्षे यांनी विद्यार्थिनींना समाजातील विविध अत्याचाराविरोधात कसे सजग राहावे,काय काळजी घ्यावी या विषयी विद्यार्थिनींशी संवाद साधला.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे,समस्यांचे मिलिंद पोंक्षे यांनी समाधान केले . कार्यक्रमासाठी नूतन कन्या प्रशाला, नूतन विद्यालय, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी तर आभार भालचंद्र गांजापूरकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शशिकांत देशपांडे, किशोर ढोके, बालाजी देऊळगावकर यांनी सहकार्य केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!